#CWC19 : विश्‍वचषकानंतर धोनी निवृत्त होणार?

एजबॅस्टन – इंग्लंड आणि वेल्स येथे सुरू असलेल्या विश्‍वचषक स्पर्धेनंतर भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी निवृत्त होणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, धोनीने 14 जूलै म्हणजेच विश्‍वचषकाचा अंतिम सामन्यादिवशी निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. धोनी किंवा बीसीसीआयने याबाबात अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, पीटीआयने बीसीसीआयमधील आधिकाऱ्याचे हवाल्याने धोनी विश्‍वचषकामध्ये आपला अखेरचा सामना खेळणार असल्याचे वृत्त दिले आहे.

बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर पीटीआयला सांगितले की, महेंद्रसिंग धोनीबाबत तुम्ही काहीही सांगू शकत नाही. मात्र, विश्‍वचषकानंतर धोनी भारतासाठी खेळत राहील याची शक्‍यता नाही. त्याने तीनही फॉरमॅटमधून कर्णधारपदाचा निवृत्ती घेण्याचा निर्णयही तडकाफडकी घेतला होता. त्यामुळे त्याच्या निवृत्तीबाबत कोणतीही भविष्यवाणी करणे कठीण आहे.

सध्याची निवड समिती ऑक्‍टोबरमध्ये होणाऱ्या सामान्य बैठकीपर्यंत कायम राहण्याची शक्‍यता आहे आणि निश्‍तिचपणे ही समिती पुढील वर्षी ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या आयसीसी वर्ल्ड टी-20 कडे पाहता बदलाची प्रक्रिया सुरू करू शकते. दरम्यान, त्यातच धोनीने विश्‍वचषकातील सात सामन्यांमध्ये 93च्या स्ट्राईक रेटने 223 धावा केल्या आहेत. धोनीने आतापर्यंत 348 वनडे सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व कले आहे. तर 90 कसोटी सामने आणि 98 टी-20 सामने खेळला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.