खाशोगी हत्या प्रकरणाच्या पार्श्‍वभूमीवर सौदीत जी 20 ची परिषद घेऊ नका

संयुक्तराष्ट्रांच्या तपास अधिकाऱ्याची सुचना

वॉशिंग्टन – पत्रकार जमाल खाशोगी यांच्या हत्या प्रकरणात सौदीच्या प्रिंसचा हात असल्याची बाब तपासात पुराव्यानिशी समोर आल्याने जी 20 देशांची सौदी अरेबियात होणारी बैठक रद्द करावी अशी सुचना या प्रकरणाचा तपास करणारे संयुक्तराष्ट्रांचे प्रतिनिधी ऍग्नेस कोलामार्ड यांनी केली आहे. ही बैठक नोव्हेंबर 2020 मध्ये रियाध मध्ये घ्यायचे ठरले आहे.

कोलामार्ड यांनी म्हटले आहे की पत्रकार खाशोगी हत्या प्रकरणात सौदीच्या प्रिंसचाच हात असल्याचे सज्जड पुरावे उपलब्ध आहेत. त्या अनुषंगांने त्यांच्यावर कारवाई करण्याचा आग्रह जी 20 च्या राष्ट्रप्रमुखांना धरता येईल. ही संधी साधून सौदीच्या राज्यकर्त्यांवर दबाव आणला जावा अशी सुचना त्यांनी केली आहे. कोलामार्ड यांनी खाशोगी हत्या प्रकरणातील आपला तपास अहवाल सौदी अरेबियाला सादर केला आहे.

अशा स्वरूपाच्या आंतरराष्ट्रीय गुन्ह्याच्या संबंधात अमेरिका आणि अन्य संबंधीत देशांना आता ठोस भूमिका घेण्याची वेळ आली आहे असेही त्यांनी म्हटले आहे. खाशोगींची हत्या हा सरकार पुरस्कृत खून आहे असे मतही त्यांनी नोंदवले आहे. आमच्या नियंत्रणात नसलेल्या आमच्या एजंटांनीच ही हत्या केली आहे त्याच्याशी सरकारचा काही एक संबंध नाही अशी भूमिका सौदी सरकारने घेतली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.