मुंबई – बॉलिवूडचा अभिनेता सनी देओलचा मुलगा करण द्रिशा आचार्यबरोबर विवाहबंधनात अडकला आहे. मागील काही दिवसांपासून त्यांच्या लग्नाचे विधी सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत होते. अखेर त्यांचा विवाह सोहळा आज संपन्न झाला आहे. लग्नात करणने क्रीम रंगाची शेरवानी आणि त्याला मॅचिंग अशी पगडी घातली आहे. तर द्रिशाने लाल रंगाच्या लेहंगा घातला आहे. या लुकमध्ये दोघेही सुंदर दिसत आहे.
सध्या या दोघांच्या लग्नाचे काही व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्यांच्या अनेकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मुंबईतील ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये धुमधडाक्यात विवाह सोहळा पार पडला. या सोहाळ्यात जवळचे नातेवाईक आणि बॉलिवूडमधील अनेक स्टार्संनी हजेरी लावली होती.
#WATCH | Veteran actor Dharmendra dances at his grandson Karan Deol’s wedding procession, in Mumbai pic.twitter.com/619CC3qmja
— ANI (@ANI) June 18, 2023
या सोहळ्यादरम्यानचा एक व्हिडिओ सध्या समोर आला असून, यामध्ये अभिनेते धर्मेंद्र आपाल्या नातवाच्या लग्नाच्या मिरवणुकीत जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत. यावेळी धर्मेंद्र यांनी ब्लॅक कोट आणि व्हाईट शर्टवर लाल रंगाचा फेटा बांधला होता. यामध्ये धमेंद्र यांच्याबराेबर त्यांच्या मुलगा अभिनेता बाॅबी देओलही थिरकताना दिसत आहे.
धर्मेंद्र यांच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी त्यांचे भरभरून कौतुक केलं आहे. याशिवाय करण आणि दृशा यांना विवाहानिमित्त भरभरून शुभेच्छाही दिल्या जात आहेत.