दिल्ली :- आफ्रिकन संघटनेला “जी 20′ संघटनेचे पूर्ण सदस्यत्व मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त करणारे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “जी 20′ संघटनेचे सदस्य असलेल्या देशांच्या नेत्यांना लिहीले आहे.
भारतात आगामी काळात होणाऱ्या “जी 20′ परिषदेदरम्यान आफ्रिकन संघटनेला पूर्ण सदस्यत्व देण्यात यावे, अशी मागणीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पत्राद्वारे व्यक्त केली असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय व्यासपिठावर आफ्रिकेचा आवाज बुलंद करण्यासाठी पंतप्रधानांनी हे धाडसी पाऊल उचलले आहे.
आफ्रिकन संघनेमध्ये आफ्रिकेतील 55 देशांचा सहभाग आहे. “जी 20′ परिषद येत्या सप्टेंबर महिन्यात नवी दिल्लीत होणार आहे. यजमान म्हणून या परिषदेचे अध्यक्षपद भारताकडे आहे. “जी 20′ चे पूर्ण सदस्यत्व मिळावे, अशी मागणी आफ्रिकन संघटनेच्या सदस्य देशांनीच व्यक्त केली आहे.
पंतप्रधानांनी ही मागणी उचलून धरली आहे. यामुळे प्रमाणिक, पारदर्शी, अधिक सर्वसमावेशक आणि प्रातिनिधीक जागतिक प्रशासनाचा आराखडा तयार करण्यास मदत होईल, असेही या अधिकृत सूत्रांनी म्हटले आहे.
दरम्यान, जागतिक “जीडीपी’च्या 85 टक्के “जी 20′ मध्ये जानेवारी महिन्यात बारताने “ग्लोबल साऊथ समिट’चे आयोजन केले होते. विकसनशील देशांसमोरील आव्हाने आणि समस्यांवर प्रकाश टाकण्यासाठी ही परिषद आयोजित करण्यात आली होती. “जी 20′ या संघटनेमध्ये जगबरातील सर्वात जास्त विकसित आणि विकसनशील देशांचा समावेश आहे. या संघटनेमध्ये असलेल्या देशांचा जगतिक “जीडीपी’मध्ये 85 टक्के, जागतिक व्यापाराच्या 75 टक्के आणि जागतिक लोकसंख्येच्या दोन तृतीयांश इतका वाटा आहे.