आळंदी – येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात माऊलींच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी मास्कचा वापर करावा असे आवाहन माऊली संस्थान कमिटीकडून करण्यात आले आहे.
चीन, अमेरिका, जपानसह अनेक देशांमध्ये करोनाची नवी लाट आली आहे. या देशांमध्ये संसर्गाचा फैलाव झपाट्याने होत असल्याने आपल्याकडे केंद्र आणि राज्य सरकारने सावधानतेच्या सूचना दिल्या आहेत. या संसर्गाचा संभाव्य फैलाव रोखणे हे शासनाबरोबर आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे.
तीर्थक्षेत्र आळंदी येथे येणारे भाविक, वारकरी, ग्रामस्थांनी मंदिरात गर्दी करू नये. वयोवृद्ध, लहानमुले, आजारी व्यक्तींनी शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जावू नये. मंदिर व परिसरात सर्वांनी मास्क घालून प्रवेश करावा, असे आवाहन संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांनी केले आहे.