Devendra Fadnvis । उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जीवे मारण्याच्या धमकी प्रकरणात किंचक नवले हे नाव पुढे आलं आहे. किंचक नवले याने देवेंद्र फडणवीस यांना प्रक्षोभक भाषा वापरत जीवे मारण्याची धमकीही दिली होती. अखेर त्याला पोलिसांनी अटक केली आहे. तीन मिनिटांत सगळे ब्राह्मण संपवतो, देवेंद्र फडणवीसांना ठार करतो म्हणत धमकी देणारा किंचक नवले याला अटक करण्यात आली आहे.
किंचक नवलेला ७ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. फडणवीसांना जीवे मारण्याची धमकी देणारा मुख्य आरोपी किंचक नवलेला वांद्रे येथील महानगर न्यायदंडाधिकारी न्यायालयाने ७ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. जीवे मारण्याची धमकी देणारी विधानाची क्लिप काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आली होती. यानंतर पोलिसांनी तपासात आता मुख्य आरोपी किंचक नवलेला सातारा येथून अटक केली आहे.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे सोशल मीडिया सेलचे उपाध्यक्ष योगेश सावंत यांनाही ७ मार्चपर्यंत पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे.
जीवे मारण्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सांताक्रूझ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेना (शिंदे) नेते अक्षय पनवेलकर यांनी याबाबत तक्रार दिली होती. पनवेलकर यांना हा व्हिडीओ सोशल मीडियावर आढळून आला होता. यानंतर पोलिसांनी योगेश सावंत याला अटक केली आहे.
हेही वाचा
Loksabha Elections 2024 | भाजपच्या 195 नावांच्या यादीत एकमेव मुस्लीम उमेदवार कोण ?