Surbhi Chandna : यंदाच्या वर्षात अनेक सिने कलाकारांनी लग्नगाठ बांधली. या दिव्या अग्रवाल आणि रकुल प्रीत सिंग या सारख्या सेलिब्रिटींचा समावेश आहे. यानंतर आता ‘इश्कबाज’ या मालिकेतील अभिनेत्री सुरभी चंदना देखील विवाहबंधनात अडकली आहे. बॉयफ्रेंड करण शर्मासोबत सुरभी राजस्थानमधील जयपूर येथे 2 मार्च रोजी विवाह केला.
सध्या सुरभी आणि करणच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. लग्नसोहळ्यासाठी सुरभी आणि करण यांनी खास लूक केला होता. सी-ग्रीन कलरचा लेहंगा, पिंक ओढणी आणि स्टोनची ज्वेलरी असा लूक सुरभीनं लग्नसोहळ्यात केला होता. तर करणनं ग्रे कलरची शेरवानी परिधान केली होती. सुरभी आणि करण यांच्या लग्नसोहळ्यातील व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यातील एका व्हिडीओमध्ये सुरभी ‘मुझे प्यार हुआ था’ या गाण्यावर डान्स करताना दिसली.
View this post on Instagram
सुरभी चंदना आणि करण हे गेल्या 13 वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. मात्र त्यांनी आपल्या नात्याबाबत गुप्तता बाळगली होती. 15 जानेवारी 2024 रोजी सोशल मीडियावर करण आणि सुरभी यांनी त्यांच्या एंगेजमेंटची अनाऊंसमेंट केली होती. त्यानंतर 2 मार्चला दोघे विवाहबंधनात अडकले.
सुरभीने नागिन या मालिकेत देखील काम केले आहे. काही दिवसांपूर्वीच ती बरुण निसर्गीसोबत ‘रक्षक इंडियाज ब्रेव्स चॅप्टर 2’ या वेब सीरिजमध्ये दिसली होती. तर करण हा उद्योजक आहे. सध्या त्यांच्या लग्नाच्या फोटोंवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.