मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यापासून भाजपच्या गोटात उत्साह दिसून येत आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये नाराजी असली तरी दुसरीकडे भाजप चे कार्यकर्ते पदाधिकारी आनंद व्यक्त करीत आहेत. नितेश राणे यांनी ट्विट करीत उद्धव ठाकरे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
Return gift pic.twitter.com/tXEd9WA0vC
— nitesh rane ( Modi ka Parivar ) (@NiteshNRane) June 30, 2022
रिटर्न गिफ्ट
नितेश राणे यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसला तर त्याचाच आता एकनाथ शिंदे गटाने घेतला असल्याचे नितेश राणे यांनी आपल्या ट्विटमधून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. सातत्याने शिवसेना आणि नेतृत्वावर जहरी टिका करणाऱ्या नितेश राणे यांनी त्याहून अधिक पटीने आपल्या कडवट भावना यामधून व्यक्त केल्या आहेत.त्यामुळे नितेश राणे यांच्या या ट्विटची सोशल मिडियावर जोरदार चर्चा होत आहे. शिवाय रिटर्न गिफ्ट असे कॅप्शन देखील त्यांनी आपल्या ट्विटला दिले आहे.
संजय राऊतांच्या ट्विटला उत्तर
सध्याच्या राजकीय परिस्थितीवरून संजय राऊत यांनी एक ट्विट केले आहे. त्यामध्ये एक व्यंगचित्र रेखाटलेले दिसून येत आहे. उद्धव ठाकरे पाठमोरे दिसत असून त्यांच्या पाठीवर जखम दिसते आहे. एकूणच पाठीत खंजीर खुपसल्याचे चित्र हे दिसत आहे. त्याला ‘नेमकं हेच घडलं ‘ असे कॅप्शन राऊत यांनी दिले आहे. त्याला उत्तर देत ‘रिटर्न गिफ्ट’ असे ट्विट नितेश राणे यांनी केले आहे.