मुंबई: भाजपच्या विधीमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या प्रस्तावाला सुधीर मुनगंटीवारांसह 11 आमदारांनी अनुमोदन दिले. त्यामुळे देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असणार आहेत.
राज्यात सत्ता स्थापनेसाठी चांगलाच गोंधळ उडाला आहे. आज मुंबईत भाजपच्या महाराष्ट्रातील नवनिर्वाचीत आमदारांची बैठक विधानभवनामध्ये पार पडली. दरम्यान, भाजप मुख्यमंत्रीपद, गृह, नगरविकास, अर्थ, महसूल सोडून इतर खात्यांवर शिवसेनेशी चर्चा करण्यास तयार आहे. तसेच उपमुख्यमंत्रीपद सोडण्यास भाजप तयार असल्याची देखील माहिती मिळत आहे.