वेस्टर्न-साउदन टेनिस स्पर्धा : वर्णद्वेषातून झालेल्या जेकब ब्लॅकच्या मृत्यूबद्दल निषेध
न्यूयॉर्क – जागतिक टेनिसमधील जपानच्या चौथ्या मानांकित नाओमी ओसाका हिने येथे सुरू असलेल्या वेस्टर्न-साउदन ओपन टेनिस स्पर्धेतील सामन्यात ऍनेट कोंटावेटचा 4-6, 6-2, 7-5 असा पराभव केला. मात्र, या विजयानंतरही तिने स्पर्धेतून माघार घेत बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. वर्णद्वेषातून जेकव ब्लॅक या व्यक्तीचा पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झाला होता. या घटनेचा निषेध म्हणून स्पर्धेतून माघार घेत असल्याचे तिने सांगितले.
एक खेळाडू असले तरी प्रथम मी एक कृष्णवर्णीय आहे. जगात वर्णद्वेष आजही कमी झालेला नाही. कोणाच्या वर्णावरून त्याचा सन्मान ठरत नाही. हा फरक कायमचा नाहीसा झाला पाहिजे व त्यासाठीच जेकबच्या समर्थनासाठी मी देखील उभी राहणार आहे, असेही तिने सांगितले. तिला पाठिंबा देत अनेक खेळाडूंनी निषेधाची भूमिका घेतल्यामुळे या स्पर्धेतील उर्वरित दिवसाच्या लढती रद्द केल्या गेल्या.