शिक्रापूर (पुणे) – करोनाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता या वर्षीचा गणेशोत्सव व मोहरम कार्यक्रम शांततेत पार पाडवायासाठी पोलीस स्टेशन हद्दीतील बारा जणांना हद्दपार करण्यात आले आहे. अशी माहिती शिक्रापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सदाशिव शेलार यांनी दिली.
शिक्रापूर पोलिसांनी लॉकडाऊन काळामध्ये बेकायदेशीरपणे दारू विक्री करणाऱ्या व्यक्तींची यादी बनवली. पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या सुचनेनुसार उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे कार्यवाही करण्यासाठी पाठवली होती. त्यानंतर दौंड विभागाचे प्रभारी उपविभागीय अधिकारी गजानन टोम्पे यांनी अमोल नारायण हंबीर, सुरेश लक्ष्मण गायकवाड, योगेश बबुशा दरेकर, गणेश लक्ष्मण बालगुडे (चौघे रा. सणसवाडी), भीमराव बाबुराव ढमढेरे (रा. तळेगाव ढमढेरे), अजय मोरसिंग बिरावत, एकानंद मोरसिंग बिरावत, रामू बकाराम लांजेवाल (तिघे रा. शिक्रापूर), अनिल अर्जुन गायकवाड (रा. मलठण), विश्वास सुखदेव भोरडे (रा. पिंपरी सांडस), अविनाश रामकृष्ण डफळ (रा. धामारी) तसेच शिवदास दोसासिंग नानावत (रा. कोरेगाव भीमा) या बारा जणांना गणेशोत्सव व मोहरम काळामध्ये शिरूर तालुक्यातून हद्दपार करण्याचे आदेश दिले.