#Video :दिवे घाटातील अपघातात संत नामदेव महाराजांच्या वंशजांचा मृत्यू

पुणे : दिवे घाटात वारकरी दिंडीला अपघात झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला असून 15 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत संत नामदेव महाराज यांचे 17 वे वंशज सोपान महाराज नामदास यांचं अपघाती निधन झाले आहे.

संत नामदेव महाराज यांची पालखी पंढरपूरवरून आळंदीला जात असताना त्याला आज सकाळी अपघात झाला. ही पालखी दिवेघाटात असताने जेसीबी अचानक या पालखीत घुसली. या घटनेत संत नामदेव महाराज यांचे 17 वे वंशज सोपान महाराज नामदास आणि अतुल महाराज आळशी अशी निधन झालेल्यांची नावे आहेत. दरम्यान, अपघातात एकाची प्रकृती गंभीर असून अन्य पाच जण गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

ब्रेक निकामी झालेला जेसीबी दिंडीत घुसल्याने हा अपघात झाला. ही दिंडी पंढरपूरहून आळंदीला जात होती. ही दिंडी दिवे घाटातील मुक्कामानंतर घाट उतरत असताना सासवडहून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या जीसीबी चालकाचे ब्रेक फेल झाल्यामुळे नियंत्रण सुटले आणि हा जेसीबी वेगात दिंडीत घुसला.

दरम्यान, बंडातात्या कराडकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली. दरवर्षी दिंडीसाठी आम्ही पोलिसांचा बंदोबस्त मागत असतो. मात्र ते प्रत्येक वर्षी आमच्याकडे दुर्लक्ष करतात. आता तरी आमच्या वारकरी भाविकांकडे लक्ष द्यावे, अशी मागणी कराडकर यांनी केली. या घटनेमुळे राज्यातील वारकऱ्यांमध्ये शोककळा पसरली आहे.

जखमींची नावे पुढीलप्रमाणे

१)विष्णू सोपान हळवाल
२)शुभम नंदकिशोर आवरे
३)दीपक अशोक लासुरे
४)गजानन संतोष मानकर
५)वैभव लक्ष्मण बराटे
६)अभय अमृत मोकम्फले
७)किर्तीमन प्रकाश गिरजे
८)आकाश माणिकराव भाटे
९)ज्ञानेश्वर निवृत्तीनाथ कदम
१०)गरोबा जडगे
११)विनोद लहासे
१२)नामदेव सागर
१३)सोपान महासाळकर
१४)गजानन सुरेश मानकर
१५)सोपान मासळीकर
१६) दीपक लासुरे

Leave A Reply

Your email address will not be published.