नवी दिल्ली – दिल्लीत लवकरच विधानसभा निवडणूक होणार असून यासाठी आपने उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मात्र, यानंतर तिकीट न मिळाल्याने पक्षांतर्गत नाराजीनाट्य सुरु झाले आहे. बदपूरमधील आपचे आमदार एन डी शर्मा यांनी पदाचा राजीनामा दिला असून त्यांनी अपक्ष लढण्याची घोषणा केली आहे. तसेच दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावर गंभीर आरोप केले.
एन डी शर्मा यांनी म्हंटले कि, मनीष सिसोदिया यांनी मला त्यांच्या निवासस्थानी बोलवले होते. सिसोदिया यांनी म्हंटले कि, राम सिंह (बदपूरचे उमेदवार) तुमच्या मतदारसंघातून लढण्यास इच्छूक आहेत. यासाठी राम सिंह २० ते २५ कोटीही देण्यास तयार आहेत. यानंतर सिसोदिया यांनी मला १० कोटींची मागणी केली. मी त्यांना पैसे देण्यास नकार दिला आणि तेथून निघून गेलो, असे शर्मा यांनी सांगितले आहे.
Sitting AAP MLA from Badarpur, ND Sharma: I have resigned from the party. I will contest election as an independent candidate. https://t.co/YJ9DgFIwUZ
— ANI (@ANI) January 15, 2020
दरम्यान, मंगळवारी आपच्या बैठकीत निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा करण्यात आली. यामध्ये ९ नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे तर १५ आमदारांचे तिकीट कापण्यात आले आहे.