मुंबई – मुंबईतल्या ‘इस्टर्न फ्री वे’ ला माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांचं नाव देण्यात येणार आहे. अशी घोषणा राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
श्री विलासराव देशमुखजींनी केलेल्या कामाला आज तुम्ही मान दिला, त्या बद्दल – मुलगा म्हणून मी सदैव आपला आभारी राहीन श्री @AjitPawarSpeaks दादा. Eastern Free Way in Mumbai to be named after #VilasraoDeshmukh – https://t.co/H4HxXiuhL1
— Riteish Deshmukh (@Riteishd) January 14, 2020
दरम्यान, यानंतर विलासराव देशमुख यांचे पुत्र आणि अभिनेता रितेश देशमुख याने अजित पवारांचे आभार मानले आहेत. रितेश म्हणाला कि, “श्री विलासराव देशमुखजींनी केलेल्या कामाला आज तुम्ही मान दिला… त्या बद्दल – मुलगा म्हणून मी सदैव आपला आभारी राहीन श्री अजित दादा”. असं ट्विट रितेशने केलं आहे.
मुंबईतल्या ‘इस्टर्न फ्री वे’ ला माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांचं नाव देण्यात येईल. त्यासंदर्भातील सूचना नगरविकास विभागाला दिल्या. तसेच परिवहन विभागासोबतच्या बैठकीत राज्यातली परिवहन सेवा सुधारण्याबाबत चर्चा केली. यावेळी वित्त, परिवहन आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) January 14, 2020
“मुंबईतल्या ‘इस्टर्न फ्री वे’ ला माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांचं नाव देण्यात येईल. त्यासंदर्भातील सूचना नगरविकास विभागाला दिल्या. तसेच परिवहन विभागासोबतच्या बैठकीत राज्यातली परिवहन सेवा सुधारण्याबाबत चर्चा केली. यावेळी वित्त, परिवहन आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते”. असं ट्विट करत अजित पवार यांनी ही माहिती दिली होती.