IPL 2024 (KKR vs GT Match 63 Update) : आयपीएल 2024 च्या 63 व्या सामन्यात गुजरात टायटन्सचा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरूध्द होता. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होणार होता. मात्र खराब हवामान आणि पावसामुळे हा सामना रद्द करावा लागला आहे. विशेष म्हणजे या सामन्यात नाणेफेकही होऊ शकली नाही.
🚨 Update from Ahmedabad 🚨
Match 6️⃣3️⃣ of #TATAIPL 2024 between @gujarat_titans & @KKRiders has been abandoned due to rain 🌧️
Both teams share a point each 🤝#GTvKKR pic.twitter.com/Jh2wuNZR5M
— IndianPremierLeague (@IPL) May 13, 2024
अहमदाबादमध्ये मुसळधार पावसामुळे IPL 2024 चा 63 वा सामना रद्द करण्यात आला आहे. पावसाने गुजरात टायटन्सच्या आशा धुळीस मिळवल्या असून हा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. आयपीएलमधील प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडणारा गुजरात हा तिसरा संघ ठरला आहे.याआधी मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्जही बाहेर गेले आहेत. सामना रद्द झाल्यामुळे कोलकाता आणि गुजरातला प्रत्येकी एक गुण मिळाला.
IPL 2024 Final : विजेतेपदाची लढत कधी आणि कुठे होणार? जाणून घ्या, किती असेल सर्वात स्वस्त तिकीट…
प्लेऑफच्या समीकरणात राहण्यासाठी गुजरातला दोन गुणांची गरज होती, पण सामना रद्द झाल्यानंतर आता एक गुण मिळाला. गुजरातचे सध्या 13 सामन्यांत 11 गुण आहेत आणि संघाचा पुढील सामना सनरायझर्स हैदराबादशी आहे. गुजरात संघाने तो सामना जिंकला तरी संघ जास्तीत जास्त 13 गुणांपर्यंत पोहोचू शकेल.
सध्याच्या गुणतालिकेत चार संघांचे 14 किंवा त्याहून अधिक गुण आहेत. अशा परिस्थितीत जीटी संघ बाहेर आहे. कोलकाता संघ आधीच प्ले ऑफमध्ये पोहोचला आहे. आता प्लेऑफमध्ये पोहोचण्याची स्पर्धा सहा संघांमध्ये आहे. अजूनही तीन जागा रिक्त आहेत. राजस्थान रॉयल्स, चेन्नई सुपर किंग्ज, सनरायझर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स हे स्पर्धेतील संघ आहेत. सामना रद्द झाल्यानंतर गुजरातच्या खेळाडूंनी लॅप ऑफ ऑनरचे प्रदर्शन केले. त्यांनी मैदानात फिरून चाहत्यांचे आभार मानले