– नीलकंठ मोहिते (प्रतिनिधी)
इंदापूर : इंदापूर शहरातील जुन्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात रविवार (25 फेब्रुवारी) रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष अध्यक्ष अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकरी व कार्यकर्त्यांचा मेळावा,
व जाहीर सभा सकाळी १० वाजता आयोजित केली, असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जंगी स्वागत इंदापुरात होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या इंदापूर येथील कार्यालयात पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी आज रोजी पत्रकार परिषदेचे आयोजित केले होते. यावेळी गारटकर पत्रकारांशी बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे इंदापूर तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे पाटील, पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील, श्रीमंत ढोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष अतुल झगडे, युवक अध्यक्ष शुभम निंबाळकर, सचिन सपकळ, दत्तात्रय बाबर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
पुढे माहिती देताना जिल्हा अध्यक्ष गारटकर म्हणाले की, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी इंदापूर तालुका यांनी पूर्णपणे केलेली असून,
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंदापूर तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करण्यासाठी पक्षाध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत. कार्यकर्ते पदाधिकारी शेतकरी वर्गाला मार्गदर्शन करणार आहेत.
राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे या मेळाव्यात इंदापूर तालुक्यात आजपर्यंत केलेल्या विविध विकास कामाचे लेखाजोखा सादर करणार आहेत. भविष्यामध्ये इंदापूर तालुक्यात आणखीन सर्वांगीण विकासासाठी काय करणे गरजेचे आहे. यावर भूमिका घेण्यात येईल.
अजितदादा पवार सांगतील तेच धोरण वअजितदादा बांधतील तेच तोरण अशी भूमिका इंदापूर तालुक्याची असणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे इंदापूर तालुका उभा राहणारा असून,लोकसभा निवडणुकीत इंदापूर तालुका अधिकचे मताधिक्य देईल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी व्यक्त केला.