औंध – महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांचे चिरंजीव तथा पार्थ अजित पवार यांचे अतिशय जवळचे म्हणून ओळखले जाणारे समीर चांदेरे यांची महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी पुणे शहर राष्ट्रवादी युवक अध्यक्षपदी निवड केली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मागील काळात माजी नगरसेवक दीपक मानकर यांची शहर अध्यक्षपदी निवड केली होती, पुणे शहर युवक अध्यक्षपद हे अतिशय महत्वाचे पद मानले जाते. माजी नगरसेवक बाबुराव चांदेरे यांचे चिरंजीव समीर बाबुराव चांदेरे यांची आज पुणे शहर युवक अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. समीर चांदेरे यांनी यापूर्वी महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस म्हणून देखील उत्कृष्टपणे काम पाहिले आहे. या कामगिरीची दखल महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी घेतली.
याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे, शहराध्यक्ष दिपक मानकर, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, आमदार चेतन तुपे, सुनील टिंगरे, माजी महापौर दत्तात्रय धनकवडे, माजी सभागृह नेते सुभाष जगताप, बंडू केमसे, माजी स्थायी समितीचे अध्यक्ष बाबुराव चांदेरे, बाळासाहेब बोडके, माजी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, माजी नगरसेविका रोहिणी चिमटे, सुषमा निम्हण आदी मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कामाची घेतली दखल…
समीर चांदेरे यांना राजकीय वारसा त्यांच्या वडिलांकडून मिळाला. त्यांच्या पावलावर पाऊल टाकत समीर यांनी करोना काळात संपूर्ण कुटुंब करोना बाधीत असताना त्या गोष्टीची पर्वा न करता नागरिकांच्या मदतीला ते धावून गेले होते. करोनाच्या काळात गोर-गरीब नागरिकांना रेशन धान्य वाटप, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करणे अशा अनेक अडचणींत त्यांनी नागरिकांना मदत केली. पिण्याचे पाणी, वीज, वाहतूक कोंडी या समस्या सोडविण्यासाठी प्रसंगी ते रस्त्यावर उतरल, अशा युवकाला मागील दोन वर्षांपूर्वी अध्यक्षपदी काम करण्याची संधी दिली नाही, याची खंत पुणे शहरातील अनेक युवक कार्यकर्त्यांमध्ये होती.