2 वर्षे जामखेडकरांना पाण्यापासून वंचित ठेवले – राळेभात यांची टीका

जामखेड – माजी मंत्री प्रा.राम शिंदे यांनी या योजनेचा संपुर्ण प्रस्ताव मार्गी लावला होता. तांत्रीक मंजुरी शासनाने दिली होती आणि आता तुम्हीही तिच योजना नवीन म्हणून गाजावाजा करत आहात. तर मग विधानसभेच्या निवडणुकांनतर तुम्ही ही योजना कार्यान्वित करण्यासाठी २ वर्षे कोणाची वाट का पाहिली ? पाण्यापासून जामखेडकरांना दोन वर्षे वंचित ठेवण्याचे पाप विद्यमान लोकप्रतिनिधींनी का केले ? फक्त मी योजना केली या श्रेय वादासाठी जामखेड करांना तहानलेले ठेवण्यात लोकप्रतिनिधींनी धन्यता मानल्याचे टिका भाजपचे नेते सोमनाथ राळेभात यांनी रोहित पवार यांचे नाव न घेत केली आहे

यावेळी देण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत जामखेड वाढीव पाणी पुरवठा योजना योजनेची ठळक वैशिष्ठे तांत्रीक तपासणी पोटी १% प्रमाणे १,२३,१९,५१४ (एक कोटी तेवीस लाख एकोणीस हजार पाचशे चौदा रुपये ) इतके म.जी.प्रा.विभाग अहमदनगर यांच्याकडे डी.आर.नं.५६३१ दि.११/०७/२०१८ अन्वये भरणा करण्यात आला होता.सदर प्रकल्पाच्या अनुषगांने पत्र क्र. नागरी २०१९/प्र.क्र.१९३(२) कावि.३३दिय२३/०८/२०१९ अन्वये प्रशासकीय मान्यता देण्यात आली असल्याचे पत्र दि.२३ ऑगस्ट २०१९ रोजी सह.सचिव नगर रचना यांचे सहीनीशी सोबत जोडले आहे. पुर्वी २ ठिकाणी मुख्य संतुलन पाण्याची टाकी (Main Balancing Reservoir) किंवा त्याला MBR म्हणतात ते आता नाहीत. त्याचप्रमाणे मुख्य टाकी MBR ६ होत्या त्या आता ५ आहेत. कदाचित तांत्रिक मुद्याचं म्हणाल तर MBR कशासाठी पाहीजे,तर शुद्धीकरण कुंभातून (Water Treatment Plant) पाणी उचललं जात नसेल तर त्याठिकाणी ते साठवून ठेवता येईल पण आता पाणी गुरुत्वाकर्षण पद्धतीने शहरात फिरावायचे आहे. त्यामुळे पंपींग नाही आणि MBR ही नाही म्हणजेच दिवसभर कोठे ना कोठे पाणी चालू राहील? असे यावरुन दिसत आहे.कदाचित आमचं तांत्रिक ज्ञान कमी असु शकते, तरी तज्ञांनी याबाबत खुलासा करावा, असा प्रश्न जाणकार उपस्थित करत आहेत.

जर नविन वाढीव पाणी पुरवठा योजना मंजुर केली म्हणता तर मग नविन काय? फक्त रकमेतील फरक हा नविन दर पत्रकामुळे पडलेला आहे. योजनेचे संकल्पचित्र (PLAN) शाश्वत उद्‌भव, (Sustainable Source) अंदाजपत्रक (Estimate) तेच आहे आणि वितरण व्यवस्था सुद्धा पहिल्याच प्लॅन मधील आहे. मग मी केलं आणि शासनाकडुन वाढीव रक्कम मंजुर केली हे अगदी ठामपणे खोटच आहे असे म्हणावे लागेल. फक्त श्रेयाची टिमकी वाजवण्यापलिकडे लोकप्रतिनीधींनी काहीही केल्याचे दिसत नाही.

असाच काहिसा प्रकार कर्जत तालुक्यातील तुकाई उपसा सिंचन योजनेच्या संदर्भात दिसून येत आहे. त्यावेळेस पाईपाच्या व्यासावरून लोकप्रतिनिधींनी या महत्वकांक्षी योजनेची खिल्ली उडवली.यामधून किती पाणी येणार ? यापेक्षा शेतकरी मोठ्या व्यासाची पाईपलाईन करतो असे सांगून तुम्ही विनोद करत होतात आणि लोकांना मोठ्या पाण्याचे स्वप्न दाखवत होतात काय झाले त्या योजनेचे ? आता तर आहे ती योजना लोकप्रतिनिधींनी बंद केली आणि योजनेसाठी वाटपाच्या व्यतिरिक्त उपलब्ध केलेले पाणीही गायब केले. म्हणजेच तुकाई उपसा सिंचन योजना मुळापासूनच उच्चाटन केले का ? तर फक्त आणि आणि स्वार्थ आणि श्रेयवाद.

लोकप्रतिनिधी श्रेय जरुर घ्या पण त्यासाठी आहे त्या योजनांना विलंब करणे, बंद करणे एका लोकप्रतिनिधीला कितपत संयुक्तीक आहे. स्वतःला लोकप्रतिनिधी म्हणवता आणि लोकांचीच जिरवता ? त्यामुळे आता लोकांचा पुरता भ्रमनिरास झालेला आहे. काेंबडं किती ही झाकुन ठेवले तरी तांबडं फुटायचे राहत नाही. प्रा. राम शिंदे यांनीच मंजूर केलेल्या योजना विद्यमान लाेकप्रतिनिधी कार्यान्वित करण्याचे काम करत आहेत. पण त्या फक्त विलंबाने करता कारण त्या योजनेचे श्रेय प्रा. राम शिंदे यांना मिळू नये बाकी जनतेची समरण शक्ती अल्प असते या गाेष्टीवर तुमचा खुप विश्वास दिसताे. परंतू जनतेच्या लक्षात आलेली आहे. तुम्ही कार्पाेरेट क्षेत्रातून आल्यामुळे तुम्ही फक्त मार्केटिंग गिमिक्स वापरले आणि जनतेला गोळ्या – बिस्किटाची भूरळ घालून भावनिक खेळ केलात. पण आता येणाऱ्या काळात जनता अशा कुरघाेड्यांना माफ करणार नाही.

तुम्ही कितीही म्हटले, आम्ही शासनाकडून काहीही आणि कितीही मंजूर करुन आणताे पण तुमच्या अभासी विकासासारखे (Virtual Development) निधीचे आकडे सुध्दा फसवे आहेत. असे म्हणावे लागेल. नवे पर्व… जुनेच सर्व.. फक्त पॅकिंग्जचा खर्च. अशी टीका राळेभात यांनी पत्रकात केली आहे

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.