महाजनादेश यात्रे समोर स्वाभिमानीचे निदर्शने

सांगली: सांगलीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या ताफ्यावर कडकनाथ कोंबड्या फेकण्यात आल्या. इस्लामपूरच्या ताकारी-पलूस रोडवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चार ते पाच कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या यात्रेच्या रथापुढे येत कोंबड्या आणि अंडी फेकली. कडकनाथ कोंबडीपालन घोटाळाप्रकरणी कारवाईच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले.

या अतिउत्साही कार्यकर्त्यांनी हातात अंडी आणि कोंबड्या घेतल्या होत्या. मुख्यमंत्र्यांच्या जनादेश यात्रेचा रथ येताच त्यांनी अंडी फेकली आणि कोंबड्या हवेत भिरकावल्या. दरम्यान, कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायात गुंतवणूक केल्यास भरघोस नफा मिळवून देण्याचे आमिष महारयत ऍग्रो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने दिले होते. यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या राज्यभरातील शेतकऱ्यांची वळपास 500 कोटींची फसवणूक झाली होती. यानंतर संचालक मंडळवर गुन्हाही दाखल झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.