टोकियो – करोना महामारीच्या काळात वर्क फ्रॉम होम ही नवीन जीवनशैली सुरू झाल्याने तर अनेक उत्पादक कंपन्यांना त्याचा फायदा झाला पण याच कालावधीमध्ये कंडोम उत्पादक कंपन्यांचा मात्र अपेक्षाभंग झाला आहे. कारण या कालावधी मध्ये लोकांचे घरी राहणे जास्त असूनही कंडोमच्या मागणीमध्ये मात्र घट झाल्याचे दिसून येत आहे.
कारेक्स ही कंपनी जगातील सर्वात मोठी कंडोम उत्पादक कंपनी आहे या कंपनीच्या मागणीमध्ये गेल्या दोन वर्षांच्या कालावधीमध्ये तब्बल 40 टक्क्यांची घट झाली आहे .अशी अपेक्षा या कंपनीने केली नव्हती ड्युरेक्स हे लोकप्रिय उत्पादक विकणाऱ्या या कंपनीला या दोन वर्षांच्या कालावधीमध्ये आपली मागणी मोठ्या प्रमाणावर वाढेल असे वाटत होते प्रत्यक्षात या कंपनीचा अपेक्षाभंग झाला आहे.
जगातील एकूण मागणीच्या 20 टक्के पुरवठा ही कंपनी करते पण आता कंडोमच्या मागणीत घट झाली असल्याने येत्या तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये ही कंपनी आता मेडिकल ग्लोव्हज चे उत्पादन सुरू करणार आहे.
महामारी आणखी काही काळ कायम राहणार असल्याने या कालावधीमध्ये वैद्यकीय व्यावसायिकांना आणि इतरांनाही मेडिकल ग्लोव्हज ची गरज असल्याने कंडोम निर्मितीतील लक्ष कमी करून आता ग्लोव्हज निर्मितीमध्ये लक्ष घालण्याचे कंपनीने ठरवले आहे. या दोन वर्षांच्या कालावधीमध्ये जगात सर्वत्रच हॉटेल व्यवसायावर परिणाम झाल्याने त्याचा अप्रत्यक्ष परिणाम कंडोमच्या मागणीवर झाल्याचे निष्कर्ष काढण्यात येत आहेत. त्याशिवाय जगातील सरकारांनी कंडोमची जाहिरात करण्याकडे मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष केल्याचेही लक्षात येत आहे. याचा एकत्रित परिणाम म्हणूनच मागणी मध्ये ही घट झाली असावी असे बोलले जात आहे.
दोन वर्षांच्या कालावधीमध्ये लैंगिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी जोडप्यांनी कंडोम व्यतिरिक्त इतर पर्यायांचा जास्त वापर केला असावा कारेक्स ही कंपनी दरवर्षी 500 कोटी कंडोम ची निर्मिती करते आणि जगातील 140 देशांमध्ये ही कंडोम्स पाठवली जातात आणि गेल्या दोन वर्षांच्या कालावधीमध्ये या मागणीमध्ये मोठ्या प्रमाणावर घट झाल्याने आता या कंपनीला अन्य उत्पादनाकडे वळावे लागले आहे.