पुणे- पुणे जिल्ह्यात करोनाची परिस्थिती आता सुधारत आहे. मात्र झिका व्हायरसने आता डोके वर काढले आहे. त्यामुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. त्या प्रार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. पुणे जिल्ह्यात झिकाचा पहिला रुग्ण हा पुरंदर तालुक्यात बेलसर या गावात मिळाला आहे. या गावात आरोग्य यंत्रणांनी विविध उपाययोजना केल्या आहेत.
झिका व्हायरसचा इतरांना प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध प्रतिबंधात्मक उपाय आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीकडून गावकऱ्यांना कंडोमचे वाटप करण्यात आले आहे. पुरुषांच्या विर्यात झिका विषाणू आढळत असल्याने खबरदारी म्हणून कंडोमचे वाटप करण्यात आले आहे.
याबरोबर आरोग्य विभागाकडून पुढील किमान चार महिने गावातील महिलांनी गर्भधारणा टाळली पाहिजे तसेच 4 महिने लैंगिक संबंध टाळाण्याही सल्ला देण्यात आला आहे. अथवा सुरक्षित पद्धतीने शरीरसंबंध ठेवावेत, असेही वैद्यकीय विभागाकडून सांगण्यात आले आहे.