नवी दिल्ली – वैज्ञानिक तंत्रज्ञानाच्या काळात आज देश प्रगती पथावर असल्याचे दिसत आहे. मात्र असे असले तरी लैंगिक शिक्षणाची कमतरता असल्याचे अनेक घटनांवरून समोर आले आहे.
यामुळे लोकांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता नाही हेच समोर येते. याबाबत अनेक गैरसमज अजुनही कायम आहेत. खरंतर, चुकीच्या माहितीमुळे अनेक वेळा शरीरावर मोठा वाईट परिणाम होतो तर काही वेळा यामुळे जीवही गमवावा लागतो.
असेच काहीसे गुजरातच्या अहमदाबादमधील घडले आहे. नको असलेली गर्भधारणा आणि लैंगिक आजार टाळण्यासाठी सुरक्षित सेक्ससाठी सलमान मिर्झा या तरुणाने कंडोम ऐवजी ग्लुने प्रायव्हेट पार्ट सील करून शारीरिक संबंध ठेवले मात्र त्याचा या कृतीमुळे त्याचा मृत्यू झाला आहे.
या घटनेचा खुलासा पोलीस तपासात झाला, या घटनेबाबत स्थानिक पोलिसांनी तपासात प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहिती दिली की,’सलमान हा त्याचा गर्लफ्रेंड जिच्यासोबत एका जुहापुरातील हॉटेलमध्ये गेले तेव्हा त्या दोघांनी ड्रग्ज घेतले त्यानंतर त्यांनी लैंगिक संबंध ठेवण्याचा निर्णय घेतला. मात्र यावेळी त्यांच्याकडे कंडोम नसल्यामुळे त्याने आपल्या प्रायव्हेट पार्ट ग्लूने सील करण्याचं ठरवले. कारण त्यांना प्रेग्नन्सीचा धोका नको होता.
यानंतर दुसऱ्या दिवशी त्याची प्रकृती बिघडल्यामुळे त्याला जेव्हा रुग्णालयात नेण्यात आले त्यावेळी त्याचा मृत्यू झाला अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. तर त्या तरुणाचा घरच्यांनी तरुणीनेच असे करण्यास त्याला भाग पडले असावे ज्यामुळे त्याचा जीव गेला असा आरोप लगावला आहे. या संपूर्ण घटनेचा तपास स्थानिक पोलीस करत असून मृताच्या विसरा नमुन्यांच्या रिपोर्टची प्रतीक्षा आहे. जे फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.