पुणे – दुकानातून कंडोम आणून देण्यास नकार दिल्याने एका अल्पवयीन मुलावर खूनी हल्ला करण्यात आला. याप्रकरणी निलेश वाघमारे (21, रा.चंदननगर) याच्यावर चंदननगर पोलीस ठाण्यात खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, फिर्यादी 17 वर्षीय मुलगा हा मित्राला भेटण्यासाठी थिटे वस्तीतून चालला होता. तेथे उभ्या असलेल्या निलेशने त्यास पैसे देऊन मेडिकलमधून कंडोम आणण्यास सांगितले. मात्र पिडीत मुलाने त्यास नकार दिला.
यामुळे निलेशने त्यास चिडून जाऊन शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. “माझे काम तु ऐकत नाहीस काय? थांब आता तुला जिवंत सोडत नाही’ असे म्हणत तेथे असलेल्या वडापावच्या हॉटेलमधून चाकू घेऊन आला. या चाकूने पिडीत मुलाच्या गळ्यावर वार करुन त्याला गंभीर जखमी केले. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक ढवळे करत आहेत.