चिंबळी -कुरूळी (ता. खेड) केंद्र शाळेच्या वतीने मे महिन्याच्या सुटीतील 34 दिवसांचा तांदूळ, मूगडाळ, हरभरा या पोषण आहाराचे पॅकिंग स्वरुपात गुरुवारी (दि. 3) वितरित करण्यात आले.
शाळा समितीचे संचालक व तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष एम. के. सोनवणे यांच्या हस्ते इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना मूगडाळ 600 ग्रॅम, हरभरा डाळ 1 किलो 200 ग्रॅम, तांदूळ 3 किलो 400 ग्रॅम तसेच इयत्ता सहावी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना मूगडाळ 900 ग्रॅम, हरभरा डाळ 1 किलो 800 ग्रॅम, तांदूळ 5 किलो 100 ग्रॅम पोषण आहाराचे वाटप काण्यात आले.
पालकांना शाळेत बोलवून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत या पोषण आहाराचे वाटप करण्यात आले असल्याचे मुख्याध्यापिका शोभा सुतार यांनी सांगितले. याप्रसंगी शाळा समितीचे अध्यक्ष चंद्रकांत सोनवणे उपस्थित होते.