नवी दिल्ली – राजधानीमध्ये चौघांनी मिळून एका तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. वडिलांच्या वाढदिवसानिमित्त केक आणण्यासाठी हा तरुण घराबाहेर पडला असता त्याचा खून करण्यात आला आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाली आहे. दक्षिण दिल्लीतील आंबेडकर नगर परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे.
वडिलांचा वाढदिवस राहिला अधूरा; केक आणायला गेलेल्या मुलाची चाकूने भोसकून हत्या, थरार सीसीटीव्ही कैद pic.twitter.com/J06G1i0lME
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) June 3, 2021
कुणाल वय १९ असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा खून एकाच तरुणीवर असलेल्या प्रेमामुळे आरोपी आणि मयत तरुणामध्ये वाद असल्याच्या कारणावरुन करण्यात आला असल्याचे पोलिसांनी माहिती देताना सांगितले आहे.
हे ही वाचा
ठाण्यात हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; दोन अभिनेत्रींना अटक
पुण्यातील प्रसिद्ध शिक्षण संस्थेतील शिक्षिकेवर बलात्कार, आरोपी शिक्षक अटकेत
स्टेटस ठेवून तरुणाची आत्महत्या, म्हणाला ”माझ्यामुळे लोकांचा मूड ऑफ, म्हणून मीच होतो दुनियेतून ऑफ”