जळगाव – जळगाव मध्ये एका २९ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. हर्षल प्रेमनाथ महाजन असे या तरुणाचे नाव असून आत्महत्येपुर्वी हर्षलने ‘माझ्यामुळे लोकांचा मूड ऑफ होतो म्हणून मीच स्वत:च दुनियेतून ऑफ होतो’ असे व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवले होते.
शहरातील आयोध्या नगरात हर्षल आपल्या आई-वडिलाबरोबर वास्तव्यास होता. दोन महिन्यापूर्वी त्याचे लग्न झालेले होते. मात्र पत्नीशी भांडण झाल्यामुळे ती माहेरी निघून गेली होती. या कारणामुळे हर्षल नैराश्यात असल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली आहे. या घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
आत्महत्येपुर्वी हर्षलचे स्टेटस
माझ्यामुळे लोकांचा मूड ऑफ झाले, पण मी स्वतः दुनियेतून ऑफ होत आहे. मी माझ्या छोट्याशा जीवनाचा प्रवास खूप छान केला. लोकांच्या मनावर अधिराज्य केले. काहींच्या डोक्यात आणि मित्र परिवार छान लाभले. माझे आई-वडील दुनियेतील खूप छान देवमाणूस आहे.पुढचा जन्म त्यांच्या पोटी जन्माला येवो ही प्रार्थना देवाला करतो.आणि कोणाला मी या गोष्टीला जिम्मेदार नाही समजत.आणि कोणाला काही चुकीचे बोलले गेले असेल तर माफी मागतो,मला माफ करा.
हे ही वाचा
ऑनर किलिंगच्या घटनेनं विदर्भ पुन्हा हादरला; २२ वर्षीय तरुणाची हत्या!
भडका! स्वयंपाक करताना अचानक सिलेंडरचा झाला स्फोट; ८ जण जागीच ठार
विवाहबाह्य संबंधांतून प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या; पत्नीने किचनमध्ये पुरला मृतदेह