नवी दिल्ली – दिल्ली सरकारने यावर्षी शहरातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांची संख्या 15 लाखांपर्यंत वाढवण्याचे आणि त्यांच्यासाठी विविध कल्याणकारी योजनांवर 20 पटीने अधिक खर्च करण्याचे लक्ष्य ठेवले आहे, असे सरकारी सूत्रांनी सांगितले आहे.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी नोंदणीकृत बांधकाम कामगारांची संख्या वाढवण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली आहे. दिल्लीत गेल्या आर्थिक वर्षाच्या अखेरी पर्यंत 13 लाख नोंदणीकृत बांधकाम कामगार होते त्यांची संख्या आता 15 लाखांवर जाण्याची शक्यता आहे.
बांधकाम कामगारांच्या कल्याणकारी योजनांवर आत्तापर्यंत केवळ 12.66 कोटी रूपये खर्च केले जात होते, तो खर्च यावर्षीपासून 246 कोटींवर नेला जाणार आहे. या योजनांमध्ये कामगारांना आर्थिक सहाय्य, मातृत्व लाभ, वृद्धापकाळ लाभ, निवृत्तीवेतन, वैद्यकी सेवा अशा सुविधा दिल्या जाणार आहेत.