Delhi Budget 2024 । दिल्लीच्या अर्थमंत्री आतिशी यांनी आज दिल्ली विधानसभेत सरकारचा 76,000 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी दिल्लीचे बजेट कमी झाले आहे. गेल्या वर्षी 78,800 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला होता. यावेळी अर्थमंत्र्यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात महिलांबाबत मोठी घोषणा केली आहे. केजरीवाल सरकार दिल्लीतील 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांना दरमहा 1000 रुपये देणार आहे. मुख्यमंत्री सन्मान योजनेअंतर्गत ही रक्कम दिली जाणार असल्याची घोषणा करण्यात आलीय.
2024-2025 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना आपल्या भाषणाच्या सुरुवातीला आतिशी यांनी केजरीवाल सरकारच्या आतापर्यंतच्या कामगिरीची माहिती दिली , 2013 मध्ये आम्ही राजकारणात प्रवेश केला तेव्हा लोकांचा लोकशाहीवरील विश्वास उडाला होता. त्यावेळी नेते ये-जा करत असत. सरकारे येत-जात राहिली. पण लोकांच्या जीवनात सुधारणा झाली नाही. त्यामुळे सर्वसामान्यांचा मतदानावरील विश्वास उडाला होता. पण अरविंद केजरीवाल आशेचा किरण बनून आले आणि त्यांनी प्रामाणिकपणा आणि सत्याचा विश्वास देऊन प्रचंड बहुमताने सरकार स्थापन केले.” असे सुरुवातीला सांगितले.
आरोग्याच्या बजेटमध्ये किती कोटी ठेवले? Delhi Budget 2024 ।
केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील दिल्ली सरकारने आरोग्य बजेट 8685 कोटी रुपये ठेवले आहे. दिल्लीतील रुग्णालयांच्या देखभाल आणि सुविधांसाठी ६२१५ कोटी रुपये ठेवण्यात आले आहेत. त्याचबरोबर मोहल्ला क्लिनिकमध्ये 212 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
आतिशीने घोषणा केली की, दिल्लीत 2025 पर्यंत 10,000 सार्वजनिक परिवहन बस असतील, ज्यात 80 टक्के ई-बस असतील. यासच दिल्लीतील अनधिकृत वसाहतींच्या विकासासाठी दिल्लीच्या 2024-25 च्या अर्थसंकल्पात 902 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.”
महिलांसाठी खास योजना Delhi Budget 2024 ।
केजरीवाल सरकारच्या बजेटमध्ये ‘मुख्यमंत्री महिला सन्मान’ योजना आणण्यात आली होती. या योजनेअंतर्गत १८ वर्षांवरील महिलांना दरमहा एक हजार रुपये मिळणार आहेत. महिलांच्या कल्याणासाठी आणि सक्षमीकरणासाठी 2024-2025 च्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री महिला सन्मान योजनेअंतर्गत 2000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
मोफत वीज आणि पाण्याची सुविधा
राजधानीतील रहिवाशांसाठी घोषणा करताना आतिशी यांनी, सर्वांना 200 युनिट मोफत वीज देण्याची सुविधा पूर्वीप्रमाणेच सुरू राहील.”असे म्हटले. तर यंदा विजेच्या बजेटमध्ये वाढ करण्यात आलीय. त्याचबरोबर भविष्यातही २० हजार लिटर मोफत पाणी मिळत राहील.असे म्हटलं.