Shraddha Kapoor and Rahul Modi| बॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळख असणाऱ्या श्रद्धा कपूरचा 3 मार्च रोजी वाढदिवस साजरा झाला. प्रोफेशनल लाईफसोबतच अनेकदा तिची वैयक्तिक आयुष्याबाबतही चर्चा रंगलेली असते. नुकतीच श्रद्धा कपूर जामनगरमध्ये अनंत अंबानी-राधिका मर्चेंटच्या प्री-वेडिंग कार्यक्रमात कथित बॉयफ्रेंड राहुल मोदीसोबत दिसली होती. ज्याचे फोटो आणि व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत. सध्या राहुल आणि श्रद्धाच्या रिलेशनशीप सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. मात्र अनेकांना राहुल मोदी कोण आहे? हा प्रश्न पडला आहे.
कोण आहे राहुल मोदी ? Shraddha Kapoor and Rahul Modi|
श्रद्धा राहुलला डेट करत असल्याची चर्चा अनेक महिन्यांपासून पसरत आहे. मात्र या दोघांनीही यावर कधीच भाष्य केले नाही. मात्र दोघेही अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसले होते. श्रद्धा कपूरचा हा कथित बॉयफ्रेंड हा एक लेखक आणि असिस्टंट डायरेक्टर आहे. ‘तू झूठी मैं मक्कार’ या चित्रपटासाठी लेखक म्हणून काम करतना राहूल आणि श्रद्धाच्या रिलेशनशीपच्या चर्चा रंगल्या होत्या. दोघेही चित्रपटाच्या सेटवर पहिल्यांदा भेटले होते.
View this post on Instagram
2022 मध्ये फोटोग्राफर रोहन श्रेष्ठसोबत श्रद्धाचे ब्रेकअप झाले होते. त्यानंतर तिच्या आणि राहूलच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले. मुंबईत जन्मलेल्या राहुलने व्हिसलिंग वुड्स इंटरनॅशनल इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षण घेतले. त्याने एमटीव्हीच्या ‘पर्सनल अत्याचार – सीजन 1’ मध्ये एक स्पर्धक म्हणून हजेरी लावली होती. राहुल मोदी ‘प्यार का पंचनामा 2’ आणि ‘सोनू के टीटू की स्वीटी’ सारख्या चित्रपटाचा भाग होता. त्यानंतर तो ‘अगले जनम मोहे बिटिया ही कीजो’ आणि ‘लाइफ विदाउट वाइफ’ या चित्रपटांमध्ये दिसला. Shraddha Kapoor and Rahul Modi |
हेही वाचा:
तब्बल 17 वेळा अपयश, तरी मानली नाही हार; अथक प्रयत्नानंतर उभी केली करोंडोची कंपनी