नवी दिल्ली – दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची गेल्या 15 वर्षांची सद्दी संपली आहे. या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून दिल्ली प्रदेश भाजपचे अध्यक्ष आदेश गुप्ता यांनी राजीनामा दिला आहे.
त्यांनी आपला राजीनामा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नढ्ढा यांच्याकडे पाठवला. त्यांनी तो स्वीकारला असल्याचे सांगण्यात येते. तथापि पर्यायी व्यवस्था होई पर्यंत ते हंगामी स्वरूपात हे पद सांभाळतील असे सांगितले जात आहे.
दिल्ली महापालिकेच्या 250 जागांपैकी भाजपला 104 जागा मिळाल्या आहेत. तर आम आदमी पक्षाने 134 जागा जिंकून येथे बहुमत प्राप्त केले आहे. भाजपने दिल्लीच्या प्रचारात पुर्ण ताकद लावली होती. सात राज्यांचे मुख्यमंत्री व चौदा केंद्रीय मंत्री दिल्लीत प्रचारासाठी तळ ठोकून होते परंतु तरीही त्यांची डाळ शिजली नाही.