ओटावा – कॅनडाच्या सरकारी कामकाजामध्ये सिंधी भाषेच्या वापराला परवानगी देण्यात यावी, अशी मागणी कॅनडाच्या संसदेच्या कनिष्ठ सभागृहात करण्यात येऊ लागली आहे. पाकिस्तानमदील कॅनडाच्या दूतावासाकडे ही मागणी मोठ्या प्रमाणात व्हायला लागली आहे.
सरकार आणि स्थानिक नागरिकांमधील संवादातील अडथळे दूर करण्यासाठी सिंधी भाषेतील वेबसाईट करण्यात याव्यात, अशी मागणी दूतावासाकडे करण्यात येऊ लागली आहे. कॅनडातील खासदार जेरेमी पात्झर (MP Jeremy Patzer) यांनी हाऊस ऑफ कॉमन्समध्ये ही मागणी केली आहे.
सिंधी भाषेला जतन करण्यासाठी कॅनडा एक पाऊल उचलू शकतो. विशेषतः विदेशातील व्यवहारांच्याबाबत सिंधीचा वापर करण्याचे पाऊल महत्त्वाचे ठरू शकते. यामुळे कॅनडा आणि सिंध प्रांतातील सिंधी नागरिकांमधील संबंध अधिक वृद्धिंगत केले जाऊ शकतील. तसेच पाकिस्तानातील अन्य समुदायांबरोबरदेखील चांगला संवाद निर्माण केला जाऊ शकेल, असे पात्झर यांनी म्हटले आहे.
पात्झर यांनी सिंध फाउंडेशनच्या सुफी लघारी आणि मीर मुझाफर तालपूर यांचा संसदेमध्ये सन्मानदेखील केला होता. सिंध फौंडेशन ही पाकिस्तानातील सिंधी समुदायाच्या मानवाधिकार हक्कांसाठी काम करणारी वॉशिंग्टनमधील स्वयंसेवी संस्ता आहे. सिंधी भाषा पाकिस्तानातील सिंध प्रांतातील भाषा असली तरी कॅनडाच्या दूतावासाने या भाषेला कराची येथील कॅनडाच्या दूतावासाने अद्याप मंजुरी दिली नाही.