रांजणगाव गणपती-रांजणगाव गणपती ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने पुणे-नगर महामार्गावरील अतिक्रमणे काढण्यात आली असल्याची माहिती सरपंच सर्जेराव खेडकर यांनी दिली.
रांजणगाव गणपती येथे पुणे-नगर महामार्गालगत अनेक अतिक्रमणे झाली होती. त्यामुळे मुख्य चौकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. तसेच बाजारपेठेमध्ये आलेल्या नागरिकांना रस्त्याने चालणेही मुश्किल होते. रांजणगाव मुख्य चौकातील पालखी ओट्या लगत ही काही नागरिकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले होते. गेल्या काही वर्षांमध्ये हा पालखी ओटा दिसेनासा झाला होता. मात्र ग्रामपंचायत प्रशासनाने भाद्रपद महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही अतिक्रमणे हटवल्याने पालखी ओट्याने मोकळा श्वास घेतला आहे.
याप्रसंगी पंचायत समितीचे माजी उपसभापती आबासाहेब पाचुंदकर, पंचायत समिती सदस्य विक्रम पाचुंदकर, सरपंच सर्जेराव खेडकर, उपसरपंच राहुल पवार, प्राध्यापक माणिक खेडकर, श्रीकांत पाचुंदकर, युवासेनेचे जिल्हाप्रमुख बापूसाहेब शिंदे या सर्व ग्रामपंचायत सदस्य व विविध संस्थांचे पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.
नमस्कार
मी निलेश मंचरकर
अहमदनगर
कृपया बातम्या साठी male voice over देण्याची संधि द्यावी.
रेकॉर्ड तसेच एडिट करून पाठवू शकतो.
धन्यवाद!