श्रीरामपूर – शिर्डी लोकसभा मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांच्या प्रचारासाठी श्रीरामपूर येथे ‘संविधान निर्धार सभा’ आयोजित करण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
शिर्डी लोकसभा वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांचा झंझावाती प्रचार दवरा सुरु आहे. मतदार संघात त्यांना सर्व समाजाचा तशेच महिला आणि तरुण तरुणींचा मोठा पाठिंबा मिळत आहे. त्यांचा विजय अधोरेखित करण्यासाठी व त्यांच्या खासदारकीवर शिक्का मोर्तब करण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर हे श्रीरामपूर शहरात दि. ४ मे रोजी श्रीरामपूर इथे येत असून त्यांच्या सभेस मतदार बंधू भगिनींनी उपस्थित राहावे असे आव्हान वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
शनिवारी 4 मे रोजी मिनी स्टेडियम, कोर्ट रोड, श्रीरामपूर येथे दुपारी 12 वाजता सभेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडी च्या संयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे.