देहूगाव -देहू नवनिर्मित नगरपंचायतीच्या 17 प्रभागाच्या निवडणुकीतील उर्वरित चार प्रभागासाठी होणाऱ्या सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण जागेसाठी निवडणुकीत सोमवारी (दि. 3) 24 जणांनी अर्ज दाखल केला आहे. यामध्ये भाजपा 4, राष्ट्रवादी कॉंग्रेस 4, शिवसेनाचा 1 असे उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे. तर कॉंग्रेसच्या एकही उमेदवाराचे अर्ज दाखल केले नाहीत.
सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींच्या 27 टक्के आरक्षणास स्थगिती दिल्याने देहू नगरपंचायत निवडणुकीतील 17 प्रभागांपैकी 11, 12, 14 आणि 15 या ओबीसी आरक्षण प्रभागाचे निवडणुका स्थगित केल्या. अन्य 13 प्रभागाचे निवडणूक घेण्यात आले होते. उर्वरित चार प्रभागासाठी सर्वसाधारण महिला जागेसाठी आरक्षण सुधारित फेर सोडत घेऊन निवडणूक प्रक्रिया प्रारंभ करण्यात आला.
अर्ज स्वीकारण्याची अंतिम दिनी सोमवारी (दि. 3) 24 जणांनी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये अनुक्रमे सर्वसाधारण महिला जागेसाठी प्रभाग 11 मध्ये 5, तर प्रभाग 12 मध्ये 6 जणांनी आणि सर्वसाधारण जागेसाठी अनुक्रमे प्रभाग 14 मध्ये 8, तर प्रभाग 15 मध्ये 5 जणांनी अर्ज दाखल केले आहेत.
आज छाननी व यादी प्रसिद्ध
नामनिर्देशनपत्रांची छाननी मंगळवारी (दि. 4) सकाळी 11 वाजल्यापासून होईल, त्याच दिवशी उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. सोमवारी (दि. 10) दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशपत्र मागे घेण्याची मुदत असणार आहे. 11 जानेवारीला चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे.
भाजपा 4, राष्ट्रवादी 4, शिवसेना 1, तर कॉंग्रेसच्या एकाही उमेदवाराचा अर्ज नाही
प्रभागनिहाय उमेदवाराचे नावे पुढीलप्रमाणे
प्रभाग 11
(सर्वसाधारण महिला)
मोरे हेमा लक्ष्मण
(2 अर्ज)
परदेशी पौर्णिमा
विशाल (2 अर्ज)
अनिता सुनील मोरे
प्रभाग 12
(सर्वसाधारण महिला)
मोरे सपना जयेश
मुसुडगे राणी विजय
मोरे रेश्मा मयूर
मोरे सिंधुताई अशोक
मणेर शबाना गुलाब
(2 अर्ज)
प्रभाग 14 (सर्वसाधारण)
काळोखे आनंदा सोपान (2 अर्ज)
हगवणे सुनील मधुकर
काळोखे प्रवीण रामदास (2 अर्ज)
हगवणे स्वप्नील सुदाम
जंबूकर संजय लक्ष्मण
चव्हाण निता जिददल
प्रभाग 15 (सर्वसाधारण)
टिळेकर ईश्वर अंकुश
(2 अर्ज)
टिळेकर अदित्य चिंतामण
टिळेकर प्रफुल्ल मच्छिन्द्रनाथ