पुणे – महापालिकेकडून येत्या गुरुवारी दि. 6 रोजी पर्वती जलकेंद्र, वडगाव जलकेंद्र व लष्कर जलकेंद्राचे अखत्यारीतील पर्वती एलएलआर टाकीवरील व रामटेकडी येथील टाकीच्या देखभाल दुरुस्तीचे तातडीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे नगररस्ता वगळता शहराच्या उर्वरित भागातील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. शुक्रवारी सकाळी उशीरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.
बंद असणारे भाग
वडगाव जलकेंद्र परिसर – हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगावपठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परिसर, कोंढवा बुद्रुक आणि परिसर
लष्कर जलकेंद्र परिसर- जीई साउथ, एसई नॉर्था, पुणे कॅन्टोनमेंट हद्दीचा सर्व भाग, जांभूळकर मळा, रामटेकडी, हेवन पार्क, आशिर्वाद पार्क, हडपसर, सय्यदनगर, काळेपडळ, महंमदवाडी, ससाणेनगर, फुरसुंगी, उरुळी देवाची, मुंढवा, केशवनगर, सोलापूर रोड, गोंधळेनगर, सातववाडी, आकाशवाणी, वैदुवाडी, साडेसतरा नळी, घोरपडी गाव व परिसर, वानवडी गाव, बी.टी. कवडे रस्ता, उदयबाग, कवडेमळा, मगरपट्टा, हांडेवाडी, मंतरवाडी, डोबडवाडी, सोपानबाग तसेच उत्तर बाजूस फातिमानगर, एस. व्ही. नगर परिसर, सेंट पॅट्रिक टाऊन, शेवकर वस्ती इत्यादी.
पेठांमध्ये दोन दिवस बंद
पर्वती जलकेंद्रावरून पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या सर्व पेठांमध्ये गुरुवारी दुपारी 12 ते शुक्रवारी दुपारी 12 पर्यंत पाणी बंद असणार आहे. त्यात दत्तवाडी परिसर, राजेंद्रनगर, लोकमान्य नगर, डेक्कन, शिवाजीनगर तर स्वारगेट, पर्वती दर्शन, मुकुंदनगर, भवानी पेठ व नाना पेठ येथील भागांना कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.