नवी दिल्ली : आज देशासह जगभरात योग दिवस साजरा केला जात आहे. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात योग कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. दरम्यान, इकडे देशातही ज्येष्ठ नेत्यांनी योग्य दिन उत्साहात साजरा केला. त्याच देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आयएनएस विक्रांतवर योगा केला आहे.
केरळ मधील कोचीत केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि नौदल प्रमुख, अॅडमिरल आर हरी कुमार यांनी आयएनएस विक्रांतवर योगा केला. त्यांच्या सह यावेळी अनेक जवानांनी देखील या कार्यक्रमात सहभाग घेतला.
#WATCH | Kochi, Kerala: Defence Minister Rajnath Singh along with Chief of the Naval Staff, Admiral R Hari Kumar performs Yoga on board INS Vikrant on #9thInternationalYogaDay. pic.twitter.com/KsaYZyptiz
— ANI (@ANI) June 21, 2023
तर दुसरीकडे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनीदेखील आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा केला. त्यांनी ओडिसा मधील बालासोर येथे योग कार्यक्रमात सहभाग घेतला.
#WATCH | Odisha: Railways Minister Ashwini Vaishnaw performs Yoga in Balasore to mark the #9thInternationalYogaDay. pic.twitter.com/HOwK5BDcWe
— ANI (@ANI) June 21, 2023
दरम्यान, आजच्या योगदिनानिमित्त केंद्र सरकारचे अनेक मंत्री विविध ठिकाणी जाऊन योगाशी संबंधित कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले आहेत.
Haryana | BJP chief JP Nadda performs Yoga at Tau Devi Lal Stadium in Gurugram on #9thInternationalYogaDay pic.twitter.com/zOtFwFgTJc
— ANI (@ANI) June 21, 2023
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त गुरुग्राममधील ताऊ देवी लाल स्टेडियममध्ये योगासने केली.