राजगुरूनगर: दिवाळी निमित्ताने राजगुरूनगर येथील थोर क्रांतिकारक हुतात्मा राजगुरू जन्मस्थळ राष्ट्रीय स्मारकात येथिल जाणीव परिवार यांच्या माध्यमातून दीपोत्सव व चिञ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते “एक दिवा हुतात्म्यांसाठी” या उपक्रमाला मोठा प्रतिसाद लाभला.
जाणीव परिवार ग्रुपच्या माध्यमातून दरवर्षी येथील हुतात्मा राजगुरू जन्मस्थळ राष्ट्रीय स्मारकात दीपावली निमित्ताने दीपोत्सव व हुतात्मा राजगुरू यांच्या जीवनपटलावर आधारित चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. रात्री सात वाजण्याच्या सुमारास दीपोत्सवाला सुरुवात झाली. शहरातील नागरिक विशेषतः तरुण तरुणी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.”एक दिवा हुतात्म्यासाठी” या जाणीव परिवार ग्रुपच्या आवाहनाला मोठा सहभाग लाभला.शहरातील असंख्य नागरिक दीपोत्सव सोहळा पाहण्यासाठी उपस्थित होते.