सुपा: परतीच्या मान्सून च्या सरी झेलत सुपे परगण्यातील कृष्णाथ चंद्रशेखर जगताप या महाविद्यालयीन तरुणाने सालाबादप्रमाणे यंदाही तोरणा किल्ल्याची हुबेहूब प्रतिकृती साकारली आहे. मुलींच्या आरोग्याविषयी प्रबोधनात्मक संदेश त्याने या किल्ल्याच्या माध्यमातून दिला आहे.
यापूर्वीही कृष्णाथ ने रायगड, जंजिरा, सिंहगड, शिवनेरी, पुरंदर या किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार केल्या आहेत. यंदा पाऊस लांबल्याने काहीसा उशीर झाला तरीही त्याचा किल्ला पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे.
तोरणा किल्ल्याच्या प्रतिकृती निर्मितीसाठी कृष्णाथ यास त्याचे वडील, आई, शिक्षिका आणि भाऊ बहीण यांनी मदत केली. संपूर्ण किल्ल्याचे बांधकाम हे निव्वळ दगड मातीत असून त्यासाठी साधारणपणे एक महिन्याचा कालावधी लागला आहे.