गडाखांचा प्रवेश नव्हे तर पाठिंबा

पुणे : अहमदनगर जिल्ह्यातील निवासा मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार शंकरराव गडाख यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याच वृत्त काही वेळा पूर्वी समोर आले होते. परंतु आत्ताच सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार घडाख यांनी सेनेत प्रवेश ना करत फक्त पाठिंबा दर्शविला आहे. गडाख यांनी मातोश्रीवर जावून पाठिंब्याचे पत्र दिले आहे.

भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे आणि गडाख हे सोबत मुंबईला गेल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. त्यानंतर शंकरराव गडाख हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या बातम्या सोमवारी दुपारपासून सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. या बातम्यांमध्ये तथ्य नसून गडाख यांनी फक्त पाठिंबा दिला असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान गडाख यांनी क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती तर या मतदार संघात राष्ट्रवादीने त्यांना समर्थन दिले होते. त्यानंतर गडाख हे कुठल्या पक्षात जातात याची सर्वांना उत्सुकता लागली होती. त्यानंतर शिवसेनेचे नेते मिलिंद नार्वेकर यांनी माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या भेटीसाठी आले होते. त्यामुळे गडाख यांनी सेनेत प्रवेश केला असल्याचे वृत्त जिल्ह्यात पसरले होते.

विखेंना ‘हात’ दाखवत गडाख शिवसेनेत

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.