बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोन लवकरच यशराज फिल्म्स कंपनीच्या चित्रपटात दिसणार आहे. कंपनीने दीपिकाला आगामी चित्रपटाबद्दल विचारणा केली आहे. विशेष म्हणजे यशराज फिल्म्सला 50 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर अनेक चित्रपटांची घोषणा कंपनीने केली आहे.
View this post on Instagram
दीपिकाने अजूनतरी फिल्म साइन केलेली नाही. दीपिका सध्या रणवीर सिंगसोबत मुंबईतील पावसात भिजण्याचा आनंद घेत आहे. ऋतिक आणि टायगर यांचा “वॉर’ हा चित्रपट दिग्दर्शित करणारे सिद्धार्थ आनंद हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहे.
या चित्रपटाबद्दलची चर्चा दीपिकासोबत लॉकडाऊनच्या अगोदरच सुरू होती. आता प्रभासच्या चित्रपटाची घोषणा केल्यानंतर या चित्रपटाविषयीही चर्चा केली जात आहे. या चित्रपटात दीपिका लीड रोलमध्ये दिसणार आहे.
दीपिकासोबत काम करण्यासाठी अजूनतरी कोणाचीही निवड करण्यात आलेली नाही. मात्र दीपिकाचा हिरो सलमान खान, आमिर खान किंवा शाहरूख खान यापैकीच एक असेल असे दिसते आहे.