नारायणगाव -खोडद (ता. खेड) हद्दीत बेकायदेशीर देशी दारू विकणाऱ्या एकावर नारायणगाव पोलिसांनी कारवाई करून गुन्हा दाखल केला आहे. गोपाल किसन जाधव (रा. खोडद, ता. जुन्नर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे.
तर पोलीस शिपाई शैलेश अरुण वाघमारे यांनी फिर्याद दिली आहे. या छाप्यात पोलिसांनी 1 हजार 40 रुपये किमतीच्या देशी दारूच्या 20 बाटल्या जप्त केले आहेत.