Deepika Padukone – अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या तिच्या फायटर या चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे. चाहते तिचा फायटर चित्रपट बघण्यासाठी उत्सुक आहे.अशात दीपिकाने चाहत्यांना आणखी एका खास चित्रपटांची माहिती दिली आहे.
दीपिकाने तिच्या हॉलीवूड प्रोजेक्टची माहिती नुकतीच शेअर केली आहे. दीपिका लवकरच एका हॉलिवूड वेब सिरीजमध्ये दिसणार आहे. या वेबसीरिजमध्ये ती हॉलीवूडच्या मोठा स्टार सोबत स्क्रेन शेअर करणार आहे.
&
View this post on Instagram
एचबीओ ची पॉपुलर टीवी सीरीज द व्हाइट लोटसमध्ये दीपिका पादुकोण लवकरच दिसणार आहे. रिपोर्टनुसार दीपिका लवकरच अनेक हॉलीवूड चित्रपटांमध्ये दिसणार आहे. याबाबत दीपिकाची सासू अंजु भवनानीने सोशल मीडियावर या बाबत हिंट्स दिले आहे.
‘द व्हाईट लोटस सीझन 3’ ला एमी अवॉर्डही मिळाला आहे. त्याच्या शेवटच्या सीझनमध्ये, हॉलिवूड अभिनेता थियो जेम्स, जेनिफर कूलिज आणि ऑब्रे प्लाझा सारखे स्टार दिसले.
दीपिका पादुकोणच्या वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास, फाइटर शिवाय ती रोहित शेट्टीच्या सिंघम 3, तसेच एस एस राजमौली ची अनटाइटल्ड फिल्म, ब्रह्मास्त्र 2, द इंटर्न, कल्कि मध्ये दिसणार आहे, तर द व्हाइट लोटस सारख्या हॉलीवूड वेब्सिरीजमध्ये दिसणार आहे.