दीपिका पदुकोणने काही वर्षांपूर्वी हॉलीवूड ऍक्टर विन डिझेलबरोबर “ट्रिपल एक्स; द रिटर्न ऑफ झांडर केज’ नावाच्या हॉलीवूडपटामध्ये काम केले होते. त्यानंतर मात्र तिने हॉलीवूडच्या सिनेमांमध्ये विशेष रस दाखवला नाही.
मात्र आता दीपिका पुन्हा एकदा एका आंतरराष्ट्रीय सिनेमामध्ये काम करणार आहे. एसटीएक्स फिल्म्स या कंपनीने अलीकडेच दीपिकाच्या या आंतरराष्ट्रीय सिनेमाची घोषणा केली आहे.
दीपिका स्वतः तिच्या “का’ प्रॉडक्शनच्या माध्यमातून या सिनेमाची निर्मितीदेखील करणार आहे. आशय संपन्न सिनेमांची निर्मिती करण्यासाठीच आपण “का’ प्रॉडक्शन सुरू केले असल्याचे दीपिकाने सांगितले. हा नवीन आंतरराष्ट्रीय सिनेमा एक कल्चरल, रोमॅंटिक कॉमेडी असणार आहे. अर्थातच दीपिका या सिनेमाची हिरोईन असणार आहे.
यामध्ये भारत आणि न्यूयॉर्कमधीलही कलाकार असणार आहेत. पण या अन्य कलाकारांची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत. याव्यतिरिक्त “83′ आणि शकुन बत्राच्या आणखीन एका सिनेमातही दीपिका असणार आहे. याशिवाय अमिताभ बच्चन आणि हृतिक रोशन यांच्याबरोबर “इंटर्न’च्या हिंदी रिमेकमध्येही ती असणार आहे.