मुंबई – सलमान आणि दीपिकाची स्क्रीनवर आतापर्यंत एकदाही जोडी बनल्याचे आठवत नाही. अनेक डायरेक्टर्सनी या दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना यश मिळाले नाही. सलमानबरोबर काम करायचे आहे, असे दीपिका अनेकवेळा म्हणाली आहे. आता तिची ही ईच्छा पूर्ण होईल, अशी शक्यता आहे. सलमान आणि जॅकलीनच्या “किक’मध्ये हिरोईन म्हणून पहिली पसंती दीपिकालाच दिली गेली होती. मात्र हा चान्स दीपिकाच्या हातातून निसटला आणि जॅकलीनने संधी मिळवली होती. आता “किक 2’ची घोषणा झाली आहे. मात्र अजून शुटिंगला सुरुवात झालेली नाही आणि हिरोईन कोण आहे, हे देखील समजलेले नाही. या सिनेमात जॅकलीन असणार आहे की नाही, अशीच शंका आत उपस्थित व्ह्ह्लआ लगली आहे. या सिक्वेलमध्ये जॅकलीनच्या जागेवर दीपिकाची वर्णी लागणार असे ऐकिवात आहे. सध्या तरी सलमान “भारत’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. त्यानंतर तो “दबंग 3’च्या शुटिंगला सुरुवात करणार आहे. नंतर “किक 2’च्या कामाबाबत मुहुर्त मिळेल. पण तोपर्यंत जॅकलीनची जागा दीपिकानेच घेतली का अन्य कोणी हे स्पष्ट व्हायला हवे.