राज ठाकरे तुमच्या कार्यकर्त्यांना समज द्या !; पोलीस आयुक्त दीपक पांडे

नाशिक – नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी निवडणूकीची तयारी सुरु केली असून यामध्ये मनसे आघाडीवर असल्याचे दिसून येते. निवडणूकीच्या या वातावरणात शहरात अनेक ठिकाणी विनापरवानगी हॉर्डींग लावल्याचे दिसून येत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर असताना नाशिक शहरात विनापरवानगी हॉर्डींग लावण्यात आले असून यावर नाशिक शहर पोलिस आयुक्तांनी कारवाई केली आहे.

नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना समज देण्याची विनंती केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राजकीय फलक पोलिसांनी महापालिकेच्या पथकांकडून काढून घेतले.

दरम्यान, ही कारवाई सुरू असताना मनसे पदाधिकाऱ्यांनी गोंधळ घालत कारवाईस विरोध दर्शवला. मात्र, पोलिस संरक्षणात महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने फलक काढून घेतले.

शहरात कोणत्याही प्रकारचे फलक लावण्यासाठी पोलिसांची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक केले आहे. आगामी सण उत्सव, निवडणुकांमुळे फलकबाजीवरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने फलक लावण्यासाठी त्यावरील मजकूर पोलिसांकडून मंजूर करणे आवश्यक आहे. त्यानंतर पोलिसांचा व मनपाचा परवानगी क्रमांक मिळाल्यानंतर फलक लावता येणार आहे. पोलिस आयुक्तांनी हा आदेश काढला होता.

आय़ुक्तांच्या आदेशाला न जुमानता तीन दिवसांनीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मुंबई नाका परिसरात मोठ्या प्रमाणात फलकबाजी करण्यात आली. राजकीय फलकबाजीमुळे परिसरातील दिशादर्शक व परिसराची माहिती देणारे फलक झाकले गेले. स्थानिक नागरिकांमध्येही याबाबत नाराजी होती.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.