Bigg Boss 3 : तृप्ती देसाईंना “बिग बॉस’चा आवाज पुरुषाचाच असल्याची अडचण

मुंबई – बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत ‘बिग बॉस मराठी’ सिझन ३ ची दणक्यात सुरवात झाली आहे. जवळपास दोन वर्षांनंतर बिग बॉस मराठी हा शो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यंदाच्या सिझनमध्ये कलाकारांसोबत काही सामाजिक कार्यकर्त्या आणि भूमाता ब्रिगेडच्या संस्थापिका तृप्ती देसाई यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे हा सिझन प्रेक्षकांसाठी उत्तम मेजवानी ठरत आहे. 

दरम्यान, सीजन सुरू होताच तृप्ती देसाई यांनी एक इच्छा व्यक्त केली आहे. बिग बॉसच्या घरात तृप्ती देसाई, किर्तनकार शिवलीला बाळासाहेब पाटील, मीनल शाह आणि सुरेखा कुडची गप्पा मारत असतात. यावेळी तृप्ती देसाई म्हणतात कि, ‘बिग बॉसचा एक सिझन फक्त महिलांसाठी हवा अशी माझी इच्छाआहे’.

पुढे त्या म्हणाल्या कि… “मला हिंदी बिग बॉससाठी बोलावले होते. पण मी त्यांना सांगितलं होतं की जर बिग बॉसचा आवाज महिलेचा असेल तरच मी येणार. आता ही मी त्यांना सांगितलं की पुढच्या कोणत्या सिझनमध्ये तुम्ही बिग बॉसचा आवाज महिलेचा करणार असाल तर मी येते. असं सुद्धा तृप्ती देसाई म्हणाल्या.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.