“आम्ही पक्ष नाही, दहशत निर्माण करतो…” म्हणत हत्या करून फेसबुकवर ‘त्याने’ टाकली पोस्ट

पाटणा : बिहारमधील  एका व्यक्तीची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली होती. या हत्येचा आरोप त्याच परिसरातील दुसऱ्या समुदायातील काही तरुणांवर ठेवण्यात आला होता. त्यानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. यादरम्यान, या हत्येमधील मुख्य आरोपी मोहम्मद लाडला याला पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, या मोहम्मद याने फेसबुकवर खूप आक्षेपार्ह लिखाण केले असल्याचे समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पूर्णियामध्ये १३ सप्टेंबरच्या रात्री एका २५ वर्षीय सन्नी सिन्हाच्या हत्येच्या प्रकरणात पकडलेला आरोपी मोहम्मद लाडला हा व्यसनाधीन आहे. त्याने हत्या केल्यानंतर आपल्या फेसबुक प्रोफाईलवर लिहिले की, आम्ही पक्ष नाही, तर दहशत निर्माण करतो. त्यामुळे…. म्हणवतो, अशी पोस्ट लिहिली.  या दरम्यान त्याने जे काही वाक्य लिहिले ते शब्दात मांडता येणार नाहीत. परिसरात तणाव निर्माण व्हावा, असा त्याचा प्रयत्न होता, हे त्याच्या लिखाणामधून स्पष्ट होत होते. दरम्यान, आरोपीने आपल्या पोस्टमध्ये भाजपा, बजरंग दल आणि आरएसएसचाही उल्लेख केला.

सध्यातरी पोलिसांनी आरोपी मोहम्मद लाडला याला अटक केली आहे. मृत सन्नी सिन्हा हा पूर्णियामध्ये उज्ज्वला स्मॉल फायनान्स बँकेमध्ये काम करत होता. घराजवळच त्याच्यावर चाकूने वार करून त्याची हत्या करण्यात आली. या प्रकरणी सन्नीच्या आईने १४ सप्टेंबर रोजी खजांची हाट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्याने पोलिसांना सांगितले की, १३ सप्टेंबरच्या संध्याकाळी त्यांचे कुटुंब घरात छठीचा कार्यक्रम साजरा करत होते. यादरम्यान, रात्री सुमारे साडे नऊ वाजता जामा मशिदीजवळ राहणाऱ्या मोहम्मद लाडला याने त्यांच्या मुलाला बोलावले.

पोलिसांमध्ये दाखल तक्रारीनुसार, आरोपीची सन्नीसोबत काही बोलचाल झाली होती. त्यानंतर तो माघारी परतला. नंतर तो पुन्हा काही सहकाऱ्यांना सोबत घेऊन परत आला आणि गोंधळ घालू लागला. जेव्हा सन्नी त्या लोकांना समजावण्यासाठी गेला तेव्हा आरोपी मोहम्मद लाडला याने त्याच्या छातीत चाकू खुपसला आणि फरार झाला. कुटुंबीयांनी सन्नीला रुग्णालयात नेले मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला. घटनेच्या सुमारे एक आठवड्यानंतर आरोपीला अटक करण्यात आले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.