मुंबई – आयसीआयसीआय बॅंकेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांना आज न्यायालयाने मनी लॉन्डरिंग प्रकरणी 19 सप्टेंबरपर्यंत सक्तवसुली संचलनालयाची कोठडी सुनावली.
दीपक कोचर यांना सोमवारी रात्री मनी लॉन्डरिंग प्रतिबंधक कायद्याखाली ‘ईडी’ने अटक केली होती.
आयसीआयसीआय- व्हिडिओकॉन दरम्यानच्या मनी लॉन्डरिंग प्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणातील मनी लॉन्डरिंगचा तपशील माहिती करून घेण्यासाठी दीपक कोचर यांची कोठडी मिळवून त्यांच्याकडे नव्याने उपलब्ध् झालेल्या पुराव्यांसंदर्भात सविस्तर चौकशी करायची असल्याचे ‘ईडी’ने सांगितले.
व्हिडिओकॉन कंपनीला आयसीआयसीआय बॅंकेकडून देण्यात आलेल्या कर्जामध्ये मनी लॉन्डरिंग करण्यात आले असल्याचे मानून यावर्षी जानेवारीमध्ये ‘ईडी’ने हे प्रकरण दाखल केले होते.