पुणे – मुंबई महापालिकेतर्फे कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाची ऑनलाइन परीक्षा 25 नोव्हेंबर रोजी निश्चित केली होती. त्याच दिवशी जलसंपदा विभागाने याच पदाची परीक्षा ठेवल्याने हजारो उमेदवारांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला होता. त्या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाने 25 नोव्हेंबर रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.
मुंबई महापालिका आणि जलसंपदा विभागाने कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या पदांची भरती सुरू केली आहे. या पदासाठी 25 नोव्हेंबर रोजी परीक्षा होणार असल्याचे ऑक्टोबरमध्येच जाहीर केले असतानाही जलसंपदा विभागाने ही 13, 25, व 26 नोव्हेंबर ही तारीख निश्चीत केली. दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आल्याने उमेदवारांमध्ये अस्वस्थता पसरली होती. कोणती तरी एक परीक्षा रद्द करावी यासाठी उमेदवारांनीही प्रयत्न सुरू केले होते. मंत्रालयातील अधिकाऱ्यांशी सतत संपर्कात राहून त्यांना या गोष्टीचे गांभीर्य पटवून सांगितले.