डेक्‍कन चॅलेंजर्स, पीसीएलटीए उप-उपांत्यपूर्व फेरीत

पुणे: सोलारिस क्‍लब व पीएमडीटीए आयोजित व रावेतकर हाऊसिंग यांच्या तर्फे प्रायोजित सोलारिस आंतरक्‍लब टेनिस अजिंक्‍यपद स्पर्धेत साखळी फेरीत डेक्कन चॅलेंजर्स, टेनिस टायगर्स, डेक्कन ऍवेंजर्स, पीसीएलटीए यांनी उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

या स्पर्धेत साखळी फेरीत डेक्कन ऍवेंजर्स संघाने सोलारीस फायटर्स संघाचा 24-09 असा पराभव करत उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. यात पद्माकर कर्वे, सचिन आराध्ये, केदार जोगळेकर, राजीव पागे, आलोक गोळे, अमूल बापट, केदार दीक्षित व सचिन आराध्ये यांनी विजयी कामगिरी केली. दुसऱ्या लढतीत डेक्‍कन चॅलेंजर्स संघाने एस हंटर्स संघाचा 24-01 असा एकतर्फी पराभव करत उप-उपांत्यपूर्व फेरी गाठली. यात मुकुंद जोशी, नितीन जोशी, मदन गोखले, अजय कामत, चिराग रुनवाल, आशिष पुंगलीया , मिहिर केळकर व मुकुंद जोशी यांनी विजय संपादन केला.

अन्य लढतीत टेनिस टायगर्स संघाने क्विनस्‌ टाऊन संघाचा 24-12 असा पराभव केला. यात तुषार वाकडे, विजय हतनकर ताकर पारीख, अभिजीत मराठे, शिवाजी यादव, इंद्रजीत दाते, केदार पाठक व सुरेश घुले यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत संघाला विजय मिळवून दिला. तर पीसीएलटीए संघाने आरपीटीए सोलारीस संघाचा 24-02 असा सहज पराभव करत उप-उपांत्यपृर्व फेरीत प्रवेश केला.

सविस्तर निकाल

साखळी फेरी – डेक्कन ऍवेंजर्स वि.वि सोलारीस फायटर्स 24-09(100 अधिक- पद्माकर कर्वे/सचिन आराध्ये वि.वि मनोज पालवे/महेंद्र गोडबोले 6-1; 90 अधिक- केदार जोगळेकर/राजीव पागे वि.वि राजू पिंपळे/सचिन खिलारे 6-2; खुला गट- आलोक गोळे/अमुल बापट वि.वि संतोष दळवी/महेंद्र गोडबोले 6-5 (7-5); खुला गट- केदार दिक्षित/सचिन आराध्ये वि.वि राजेंद्र देशमुख/अनुज पिंपळे 6-1);

डेक्कन चॅलेंजर्स वि.वि एस हंटर्स 24-01(100 अधिक- मुकुंद जोशी/नितिन जोशी वि.वि लक्ष्मीकांत श्रोत्री/संजय बाबर 6-0; 90 अधिक- मदन गोखले/अजय कामत वि.वि दिपू गलगली/सुरेंद्र देशमुख 6-0; खुला गट- चिराग रुनवाल/आशिष पुंगलीया वि.वि आनंद परचुरे/ मयुर कुलकर्णी 6-1; खुला गट- मिहिर केळकर/मुकुंद जोशी वि.वि दिपू गलगली/दयानंद देशपांडे 6-0);

टेनिस टायगर्स वि.वि क्विनस्‌ टाऊन 24-12(100 अधिक- तुषार वाकडे/विजय हतनकर वि.वि संतोष जयभाय/जितेंद्र जोशी 6-0; 90 अधिक- ताकर पारीख/अभिजीत मराठे वि.वि रुपेश मेटकर/सुरेंद्र 6-5(7-5); खुला गट- शिवाजी यादव/इंद्रजीत दाते वि.वि महेंद्र प्रभु/सरवानन 6-5(7-2); खुला गट- केदार पाठक/सुरेश घुले वि.वि मंदार पाटील/अमृत खोडके 6-2);

पीसीएलटीए वि.वि आरपीटीए सोलारीस 24-02(100 अधिक- राजेश/गिरीष वि.वि संजीव घोलप/जयंत पवार 6-1; 90 अधिक- रवी जौहानी/निर्मल वाधवानी वि.वि रवी बजाज/हेमंत भोसले 6-1; खुला गट- नंदू रोकडे/विशाल साळवी वि.वि अन्वित पाठक/सिध्दु 6-1; खुला गट- जॉय बॅनर्जी/अनंत गुप्ता वि.वि संजीव घेलप/शैलेश पटवर्धन 6-1). एफसी फाल्कन्स वि.वि सोलारीस डायनामोज्‌ 24-07(100 अधिक- रवी बजाज/एसके प्रसाद वि.वि रवी भांडेकर/संभाजी शिंदे 6-4; 90 अधिक- कपिल बारवके/निलेश भोसले वि.वि अभय कुलकर्णी/संजय अगरवाल 6-1; खुला गट- संज्योत तावडे/केदार राजपाठक वि.वि मंदार काळे/यशराज उभे 6-1; खुला गट- वैभव अवघडे/गणेश देवखीळे वि.वि श्रीकांत पवार/पार्थ सहस्त्रबुध्दे 6-1).

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.